कोल्हापूर : राजर्षी शाहूंची भूमिका साकारताना रंगमंचावरच एक्झिट घेतलेला अभिनेता सागर चौगुले च्या मुलीच्या नावे ५ लाखांची ठेव आणि त्यांच्या पत्नी वनिता यांना शासकीय नोकरीत रुजू करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी जाहीर केले.